Thursday 28 May 2015

२८  मे २०१५ आई  स्मृती दिनाचे दुसरे वर्ष
         स्मरण
आई निघून गेली अचानक आठवणींचा डोंगर सोडून गेली. आई कडून   बरेच  प्रेमाने  कसे राहायचे व आलेल्या माणसांचे आदरात्तीथ्या कसे करायचे हे माहित पडले . तसेच मेहनत घेऊन धन्दाशेती कशी सांभाळायची, भांडी स्वछ्करून केर कचरा काढून    घराला घरपण आणून  पोरे बाळे  सांभाळून आपली कामे आटोपशीर कशी  होतील ह्याचे  ज्ञान मिळाले .  तुझे आदर्श ईमान्दारी कसलेली मेहनत व वेळी अवेळी काम करण्याची क्षमता पाहून मलाही हिम्मत आणि ताकत येत होती व काम करण्याचा उत्साह वाढत होता व  थकवा पार निवळून जायचा . तुझ्या आशीर्वादानेच सर्व काही ठीक चालत आहे जसेच्या तसेच काम धंदे चालले आहेत  तरीपण तुझी कमी कधीच भरून निघणार नाही आणि उणीव नेहमीच राहील. तुझा धडाडीपणा  आणि  साधेपणा व झटपट काम आटपण्याची  क्षमता हे कधीच विसरणार नाही . तुझे आधात्मिक ज्ञान व अचानक मला सांगायची पूजा घालू या मी भटजी बोलावला आहे व पूजेचे सामान   आणि दुर्वा  तुळस आपण मोजून चौरंग मखर तयार करून  दुपारी ३ वाजता पूजा ठेवायची आहे. वर्षातून तुज्या हातून ३-४ पूजा होत होत्या हे मी कधीच माझ्या आयुष्यात विसरणार नाही.  देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home