Tuesday, 25 August 2015

26th AUGUST DR. A. N. BHALERAO

Auditoriums / Reference Library
Dr. A. N. Bhalerao Auditorium
 This auditorium, which includes ground & first floor, has the capacity to accommodate 816 persons. In this air-conditioned auditorium with latest facilities, various cultural programmes like professional / experimental plays, dances, folk art, school functions and literary festivals are frequently organized.
   
 
Dr. B.N. Purandare Lecture Hall
 Dr. B.N. Purandare Lecture Hall is on the 5th floor of the Sangha building. It can accommodate an audience of 120 persons and is useful for small functions, professional meetings and music programmes.
   
 Reservation of Dr. A. N. Bhalerao Auditorium is with Shri. Rohidas Pange.
Telephone number : (022) 2385 6303
Ext : 27
 
Gajendragadkar Memorial Reference Library
 A resolution to start a reference library in the name of Prof. A. B. Gajendragadkar, one of the Sahitya sangha founder members, was passed in the meeting of the executive body of the sangha, held on 17th November 1947.

Shri. A. A. Gajendragadkar handed over a large collection of books made by his father to the Sahitya sangha, to start this library. Shri. R. D. Karve also gifted his collection of books. Shri. S. B. Shirgaonkar, Shri. Agaskar and several other members also contributed to the collection.

The library has about 14,700 books written in Marathi, Sanskrit and English. They include dictionaries, literature manuals, novels, short story collections, plays and books about plays, books on philosophy as well as several periodicals.

Many research students have benefitted from this reference library.

The library is on the 4th floor of the Sangha building.
डॉ. अ. ना. भालेराव

सुस्वागतम



मुंबई मराठी साहित्य संघ

मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमी यांचे मुंबईतील गौरवस्थान


आपण ह्या संकेतस्थळास भेट देणारे 5846 वे अतिथी आहात.
View this website in English
संघाचा खुला रंगमंच
स्थापना
मुंबई मराठी साहित्य संघ – मुंबईतील एक अग्रगण्य संस्था ! सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवून, नावलौकिक सार्थ करणारी ! या संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा केला, सुवर्णमहोत्सवाच्या स्मृती कोरल्या, हीरकमहोत्सव व अमृतमहोत्सवाची तेजस्वी पाऊले उमटवून ‘साहित्य संघ’ आता शतकाकडे वाटचाल करीत आहे.
मुंबई शहर आणि उपनगर भागांत मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्याच्या हेतूने मुंबई मराठी साहित्य संघाचा जन्म २१ जुलै १९३५ रोजी झाला. १९३४ साली मुंबई येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली. या अधिवेशनापासून साहित्यिक स्वरूपाचे स्थायी कार्य करण्यासाठी अशी संस्था स्थापन करण्याची कल्पना निघाली. साधनांच्या मर्यादेप्रमाणे साहित्य संघाचे प्रारंभीचे कार्य मर्यादित राहिले. मुंबई व उपनगर भागांत वार्षिक साहित्य संमेलने भरविणे, साहित्यविषयक प्रासंगिक चर्चा घडवून आणणे, आल्या-गेल्या साहित्यिकांचा परामर्श घेणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वर्ग चालविणे, स्वतःची नियतकालिके चालविणे, कै. वामन मल्हार जोशी स्मरणार्थ दरसाल एखाद्या विद्वान वक्त्यांची पूर्वनियोजित व्याख्याने करवून ती शक्य तेंव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणे, व्याख्यानमाला चालविणे, असे या कार्याचे विविध प्रकारचे स्वरूप होते.
१९३८ साली स्वा. सावरकर व १९५० साली राजकवी यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलने भरली ती संघाच्याच वतीने. तथापि, १९४१ साली मुंबईस संघाच्या विद्यमाने भरलेले महाराष्ट्र नाट्यसंमेलनाचे ३२ वे अधिवेशन संघाच्या कार्यास जरा निराळी व जोराची कलाटणी देण्यास कारणीभूत ठरले. मराठी रंगभूमीस १९४३ साली १०० वर्षे पूर्ण होतात हे लक्षांत घेऊन त्यावर्षी महोत्सव करण्याची कल्पना याच अधिवेशनात निघाली. त्यावर्षी मुख्य महोत्सव सांगली येथे नोव्हेंबर महिन्यात झाला, तरी एप्रिल १९४४ मध्ये साहित्य संघाने मुंबई येथे नाट्योत्सव मोठ्या प्रमाणावर खुल्या नाट्यगृहात पुनः साजरा केला, इतकेच नव्हे तर त्यानंतर दरसाल कमीअधिक प्रमाणात मुंबईत नाट्योत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. ही प्रथा आजपर्यंत संघाने अव्याहत पाळली आहे. खुल्या नाट्यगृहाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली असली तरी अलीकडे मुंबईत व इतरत्र ती संघाने लोकप्रिय केली. १९४४ साली पहिला नाट्योत्सव साजरा करत असतानाच ‘साहित्य संघाच्या व तत्सम इतर संस्थांच्या साहित्यविषयक चळवळींकरिता व मुंबईतील नाट्यसंस्थांना प्रतिष्ठित समाजासमोर अल्प भाडयात नाट्यप्रयोग करून दाखवण्याची सोय करणे’ असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. तो तर साध्य केला गेलाच, परंतु लवकरच गिरगावातल्या केळेवाडीतील जमीन संपादन करून संघाने तेथे एक अद्ययावत नाट्यगृह बांधले. ६ एप्रिल १९६४ रोजी या संघमंदिराचं उद्घाटन झाले आणि मराठी रंगभूमीला हक्काचं घर मिळाले.
प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर, श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर, श्री. श्री. म. वर्दे, श्री. रामराव विजयकर, श्री. भास्करराव जाधव, श्री. भा. सी. सुकथनकर, श्री. र. धो. कर्वे, श्री. खं. सा .दौंडकर असे मुंबईच्या विविध समाजातील थोर कार्यकर्ते संघाच्या बाल्यावस्थेत संघास लाभले आणि त्यांच्या विविध गुणांचा संघाला फायदा मिळाला म्हणूनच संघाबद्दल अल्पकाळात सार्वत्रिक आपुलकी निर्माण झाली, प्रतिष्ठा वाढली व साहित्य संघ मंदिराचे स्वप्न साकार झाले.
साहित्य संघाचे कार्यक्षेत्र :
  • व्याख्याने
  • सभा
  • संमेलने
  • भाषाध्यापन
  • ग्रंथनिर्मिती
  • संदर्भ ग्रंथालय
  • कविसम्मेलने
  • प्रकाशने
  • नियतकालिके
  • साहित्य सेवा पारितोषिके
  • नाटके
  • प्रायोगिक नाटकांसाठी रंगमंच
  • नाट्यशिक्षण
  • नाट्यसेवा पारितोषिके

प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर


दाजीसाहेब तुळजापूरकर

श्री. म. वर्दे

चं. वि. बावडेकर

भास्करराव जाधव

भा. सी. सुकथनकर

र. धो. कर्वे

खं. सा .दौंडकर





















प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर








अजब न्याय वर्तुळाचा

प्रा. न. र. फाटक































कुसुमाग्रज जन्मशताब्दी
महत्वाचे टप्पे
  • दि. २१ जुलै १९३५ – मुंबई मराठी साहित्य संघ स्थापना व कार्याचा शुभारंभ.
  • १९३६ – स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर, कृष्ण सिनेमागृहात साहित्य संघातर्फे प्रकट सत्कार.
  • दि. १७ एप्रिल १९३७ – साहित्य संघाचा पहिला संघदिन ‘जयलक्ष्मी’ या नौकेवर उत्साहाने साजरा. श्री. म. वर्दे यांनी साहित्य संघाची पहिली घटना तयार केली. संघाचे पहिले मुखपत्र ‘वीणा’ चा प्रकाशन समारंभ. संपादक: श्री. म. वर्दे.
  • १९३८ – महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या २२ व्या अधिवेशनाचे आयोजन. अध्यक्ष: स्वातंत्र्यवीर सावरकर. या साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘मायाविवाह’ या नाटकाचा संघातर्फे प्रयोग करण्यात आला.
  • १९३८ ते १९४१ – परिभाषा मंडळ, शुद्धलेखन प्रचार, कॉपीराईट कायदा फेरविचार आणि सुधारणा या चळवळींचे प्रभावी आयोजन.
  • १९४० – मुंबई मराठी साहित्य संघाच्या संघमुद्रेची (बोधचिन्ह) निर्मिती – चित्रकार दिनानाथ दलाल.
  • १९४१ – साहित्य संघातर्फे ३२ वे मराठी नाट्य संमेलन विल्सन हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आले. अध्यक्ष: आचार्य प्र. के. अत्रे. या नाट्यसंमेलनात साहित्य संघाने नाट्यगृह बांधण्याचा संकल्प सोडला.
  • १९४३ – सांगली येथे मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा झाला. साहित्य संघातर्फे ‘शारदा’ नाटकाचा देखणा प्रयोग करण्यात आला. बालगंधर्व, केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर, चिंतोपंत गुरव अशा अनेक दिग्गज कलावंतांनी या प्रयोगात भूमिका केल्या होत्या. या प्रयोगाचे धुरीणत्व डॉ. अ. ना. भालेराव यांनी केले.
  • दि. १२ एप्रिल १९४४ – साहित्य संघाने आपला भव्य नाट्योत्सव साजरा केला. या नाट्योत्सवात नाट्यरसिकांचे विराट दर्शन झाले आणि मराठी रंगभूमीला नवसंजीवनी मिळाली. या नाट्यमहोत्सवात झालेल्या ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाला प्रकाश पिक्चर्सचे विष्णुपंत औंधकर सुवर्णपदक मिळाले. शारदेचे काम करणाऱ्या वासंती या अभिनेत्रीला ‘सुशीलकुमार रुईया’ सुवर्णपदक मिळाले. या नाट्यमहोत्सवात ‘भाऊबंदकी’ नाट्यप्रयोगात भूमिका करणाऱ्या नानासाहेब फाटक आणि शिवराम परांजपे यांना रौप्य करंडक, तर ‘वेड्यांचा बाजार’ या नाटकात भूमिका केलेल्या अनंत वर्तक यांना ‘सुशीलकुमार रुईया’ सुवर्णपदक मिळाले.
  • १९४७ मध्ये साहित्य संघाने ‘साहित्य’ हे द्वैमासिक सुरु केले.
  • १९४७ – भारत स्वतंत्र झाला. साहित्य संघाने या महान आनंददायी पर्वणीनिमित्त खास कार्यक्रम आखून स्वातंत्र्योत्सव साजरा केला.
  • १९४८ – साहित्य संघाने अ. बा. गजेंद्रगडकर संदर्भ ग्रंथालय सुरु केले.
  • १९४९ – साहित्य संघाच्या नाट्यशाखेची स्थापना झाली. या नाट्यशाखेतर्फे त्वरित नाट्यशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले. या वर्गांना केशवराव दाते, नानासाहेब फाटक, पार्श्वनाथ आळतेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
  • १९५० – ३३ वे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरवले. अध्यक्ष : राजकवी यशवंत.
  • दि. २२ ऑक्टोबर १९५० – साहित्य संघ उभारणीसाठी जमीन खरेदी : एक आनंद सोहळा.
  • दि. २७ ऑक्टोबर १९५२ – भूमिप्रवेश, भूमिपूजन – केंद्रीय मंत्री न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते. पौरोहित्य : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.
  • १९५३ – साहित्य संघाची लहान वास्तू आणि रंगमंच, खुले नाट्यगृह संपन्न, खुल्या नाट्यगृहात नाट्योत्सवाचा शुभारंभ.
  • १९५३ – भारतीय रेल्वे शताब्दी समारंभात दिल्ली येथे साहित्य संघ नाट्यशाखेला ‘भाऊबंदकी’ आणि ‘खडाष्टक’ ही नाटके सादर करण्याचा बहुमान मिळाला.
  • १९५४ – भारत शासनाने दिल्ली येथे राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले. या नाट्यमहोत्सवात चौदा भाषांतील नाट्यप्रयोग झाले. साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ या नाट्यप्रयोगास पारंपारिक विभागाचे प्रथम पारितोषिक, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. साहित्य संघाने मराठी नाटकाचा ध्वज राजधानीत फडकविला.
  • २६ जानेवारी १९५७ : पु. ल. देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘तुझे आहे तुजपाशी’ या संघ नाट्यशाखेच्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. ‘शारदा’, ‘भाऊबंदकी’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘टिळक आणि आगरकर’ ही संघाची नाटके, नाट्यशाखेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत.
  • १९५८ – साहित्य संघाची बालनाट्य शाखा ‘मधुमंजिरी’ या बालनाट्यप्रयोगाने कार्यरत झाली.
  • ७ जानेवारी १९६० – संघमंदिराचा कोनशिला समारंभ भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते झाला.
  • १९६२ : डॉ. अमृत नारायण भालेराव यांच्या स्मरणार्थ ‘अमृत नाट्य भारती’ या नाट्यविभागाची स्थापना.
  • १९६३ – केळेवाडी या संघमंदिरासमोरील मार्गाचे, मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘डॉ. अ. ना. भालेराव मार्ग’ असे नामकरण झाले. यासाठी नगरसेवक अप्पा पेंडसे, डॉ. बाबा कलगुटकर या साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • १९६४ – साहित्य संघाच्या वाड़मयीन परीक्षांचे वर्ग सुरु करण्यात आले.
  • ६ एप्रिल १९६४ – साहित्य संघ मंदिराच्या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन समारंभ भारताचे माजी संरक्षण मंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला.
  • १ ऑगस्ट १९७० – अमराठी प्रौढांसाठी मराठी भाषा वर्ग सुरु झाला.
  • १९७४ – साहित्य संघ नाट्यशाखेतर्फे जर्मनीचा यशस्वी दौरा. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकाचे झुरिच आणि बर्लिन येथे नाट्यप्रयोग. वायमार येथील राष्ट्रीय नाट्यशिक्षण केंद्रात, संघ नाट्यशाखा आणि कलावंत यांचा सत्कार. हा दौरा डॉ. बाळ भालेराव यांच्या नेतृत्वाने सफल.
  • १९७६ – प्रख्यात कादंबरीकार वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, यानिमित्त संघातर्फे त्यांचा सत्कार.
  • १९८० – कै. न. र. फाटक संशोधन केंद्राची स्थापना.
  • १९८२ – संघ नाट्यशाखेतर्फे ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाची निर्मिती.
  • १९८६ – मुंबई मराठी साहित्य संघातर्फे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या हीरक महोत्सवी साहित्य संमेलनाचे आयोजन. अध्यक्ष : विश्राम बेडेकर.
  • १९८६-१९८७ – नाट्यसमीक्षक मेळाव्याचे आयोजन.
  • १९८९ – ज्ञानपीठ पारितोषिक मानकरी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा सत्कार.
  • १९९० – मुंबई मराठी पत्रकार संमेलनाचे आयोजन.
  • १९९० – मराठी प्रकाशक संमेलनाचे आयोजन.
  • दि. २०-२१ एप्रिल १९९१ – विनोदी साहित्य संमेलन.
  • १९९२ – भाषाभगिनी संमेलन.
  • १९९४ – साहित्य संघ नाट्योत्सव, सुवर्ण स्मृती नाट्योत्सव.
  • दि. १४-१५ जानेवारी १९९५ – विभागीय संमेलने.
  • १९९५ – मुंबई मराठी साहित्य संघ हीरक महोत्सव.
  • दि. २२ ते २४ मार्च १९९६ – मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन (पूर्वी मुंबई व उपनगर साहित्य संमेलन म्हणून संबोधत.)
  • १९९६ – साहित्य संघाची प्रतिवार्षिक साहित्य सेवा, नाट्यसेवा पारितोषिक योजना प्रारंभ.
  • २००१ ते २००२ – कै. डॉ. अ. ना. भालेराव जन्मशताब्दी.
  • दि. १२ एप्रिल २००३ : ३२वे मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन – एक सांस्कृतिक सरिता (साहित्य संघाच्या ६५ वर्षांतील कार्याचा आढावा) प्रकाशित.
  • दि. १४ ऑगस्ट २००३ – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पहिली वक्तृत्व स्पर्धा.
  • दि. १६ नोव्हेंबर २००३ – संघातर्फे पहिले महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन.
  • डिसेंबर २००३ – अमृतकुंभ त्रिस्तरीय एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ. १) युवा अमृत महोत्सव २) अमृतवेल करंडक (हौशी गट) आणि ३) अमृत कर्मश्री करंडक (कर्मचारी गट)
  • दि. १७ मार्च २००४ – रंगसंग या प्रायोगिक नाटकांच्या उपक्रमाचे उद्घाटन – सुप्रसिध्द अभिनेते व दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या हस्ते.
  • दि. १४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २००५ – रंगसंग तर्फे १२ नाटकांचे बहुभाषिक (उर्दू, गुजराती, इंग्रजी, हिंदी व मराठी) रंगोत्सव.
  • दि. १२ डिसेंबर २००७ – साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक प्रा. गंगाधर गाडगीळ पुरस्कृत पहिला मिलिंद गाडगीळ स्मृती बालवाड़मय पुरस्कार निलीमकुमार खैरे यांच्या चंदुकाका या बालवाड़मयाच्या पुस्तकास प्रदान.
  • १३ फेब्रुवारी २००८ – अमृत व्याख्यानमालेचा प्रारंभ. पहिले व्याख्याते : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि विषय : शिवछत्रपती आणि मराठी भाषा.
  • २४ ऑक्टोबर २००९ – साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचा आरंभ. अध्यक्ष : ज्येष्ठ कथाकार प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम), यावेळी ‘मराठी बोलु कौतुके’ पुस्तक प्रकाशित.
  • २८ ऑक्टोबर २०१० – साहित्य संघाचा ७५ वा वर्धापनदिन साजरा, महनीय प्रवक्त्या : डॉ. विजया राजाध्यक्ष.
  • मार्च २०११ – महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने २५ मार्च ते २७ मार्च असे तीन दिवस ‘साहित्य महोत्सवा’चे आयोजन.
  • २७ फेब्रुवारी २०१२ – साहित्य संघाच्या प्रवेशद्वाराजवळ कविवर्य कुसुमाग्रजांच्या भाषणातील दोन लेखशिलांचे अनावरण हस्ते : ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर.
संस्था संचालक
विश्वस्त

सॉली. श्रीम. विजया दिवेकर

श्री. हरिविजय गुर्जर

श्रीम. अचला जोशी

श्री. प्रवीण काटवी
अध्यक्ष

श्री. मधु मंगेश कर्णिक
उपाध्यक्ष

श्री. मल्हार ढगे

श्री. माधव खाडिलकर

श्री. प्रकाश पागे

श्री. गुरुनाथ दळवी
 
श्री. अच्युत फडके

श्री. अमोद य. उसपकर
 
प्रमुख कार्यवाह
कार्याध्यक्ष
कोषाध्यक्ष

डॉ. बाळ भालेराव

श्रीम. उषा तांबे

श्रीम. आशा मुळगावकर
कार्यवाह
साहित्य शाखा
कार्यवाह
नाट्य शाखा
कार्यवाह
आस्थापना व्यवस्थापन
कार्यवाह
संघमंदिर व्यवस्थापन

डॉ. श्रीम. उज्ज्वला मेहेंदळे

श्री. सुभाष भागवत

श्री. सुनील मेहेंदळे

श्री. दिलीप भाटवडेकर
कार्यकारी मंडळ
डॉ. बाळ भालेराव, श्रीम. आशा मुळगावकर, श्रीम. उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, श्री. सुभाष भागवत, श्री. सुनील मेहेंदळे, श्री. दिलीप भाटवडेकर, श्री. मनोहर सोमण, श्री. विलास म्हामणकर, श्री. अशोक बेंडखळे, श्री. चंद्रशेखर गोखले व श्री. रोहिदास पांगे.

स्वीकृत सदस्य : श्री. स्वामीकुमार बाणावलीकर, प्रा. सुहासिनी कीर्तिकर.

नियामक मंडळ
श्री. एकनाथ आव्हाड, श्री. अरविंद कर्पे, प्रा. सुहासिनी कीर्तिकर, श्रीम. मोनिका गजेंद्रगडकर, श्री. चंद्रशेखर गोखले, श्री. सुधीर ठाकूर, प्रा. उषा तांबे, श्री. प्रवीण धैर्यवान, श्रीम. कुंदा पडळकर, श्री. उमेश पडळकर, श्री. नारायण पराडकर, श्री. प्रमोद पवार, श्री. अरविंद पिळगावकर, श्रीम. मंगला पंडित, श्री. रोहिदास पांगे, श्री. नरेंद्र पाठक, श्री. स्वामीकुमार बाणावलीकर, श्रीम. प्रतिभा बिस्वास, श्री. अशोक बेंडखळे, श्री. सुभाष भागवत, श्री. यशवंत प. भिडे, श्री. दिलीप भाटवडेकर, डॉ. बाळ भालेराव, डॉ. अश्विनी भालेराव गांधी, श्रीम. आशा मुळगावकर, डॉ. शशांक मुळगावकर, श्रीम. शकुंतला मुळ्ये, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, श्री. सुनील मेहेंदळे, श्री. विलास म्हामणकर, श्री. सुहास ना. वीरकर, श्री. पद्माकर शिरवाडकर, श्री. मधुकर शेजवलकर, श्रीम. प्रतिभा सराफ, श्री. जयराज साळगावकर, श्री. मनोहर सोमण, श्रीम. सावित्री हेगडे.

स्वीकृत सदस्य : श्रीम. धनश्री धारप, श्रीम. रेखा नार्वेकर, श्री. नंदकुमार मांजरेकर, श्री. सतीशचंद्र म्हात्रे, श्रीम. शैलजा म्हात्रे.
About 112 results (0.33 seconds) 
    Stay up to date on results for an bhalerao auditorium.
    Create alert
    About 11,500 results (0.50 seconds) 
        1. Mumbai Marathi Sahitya Sangh 
        2. Cultural Center
        3. Address: Dr. A. N. Bhalerao Marg, Near St Theresa High School, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004
          Phone:022 2385 6303
      Kharghar, Navi Mumbai, Maharashtra - From your Internet address - Use precise location
       - Learn more   




      0 Comments:

      Post a Comment

      Subscribe to Post Comments [Atom]

      << Home